फुलेनगरमधील सराईत गुन्हेगार ‘पटल्या’स अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 04:33 PM2018-10-13T16:33:04+5:302018-10-13T16:33:36+5:30
नाशिक : गुन्हेगारी कृत्यामुळे शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरातच वावरणारा फुलेनगरमधील सराईत गुन्हेगार गणेश गौतम गायकवाड ऊर्फ पटल्या (२०, रा. अवधूतवाडी, फुलेनगर) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़
नाशिक :गुन्हेगारी कृत्यामुळे शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरातच वावरणारा फुलेनगरमधील सराईत गुन्हेगार गणेश गौतम गायकवाड ऊर्फ पटल्या (२०, रा. अवधूतवाडी, फुलेनगर) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़
शहरातील पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या पटल्या यास पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी १५ जुलै २०१७ रोजी शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते़ तडीपारीची कारवाई केलेली असतानाही शुक्रवारी (दि़१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास पटल्या दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळ आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्यास ताब्यात घेतले़
याप्रकरणी संशयित पटल्याविरोधात मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
पखालरोड परिसरात घरफोडी
नाशिक : बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़११) पखालरोडवरील हॅपीहोम कॉलनीजवळ घडली़
मायरॉन इंग्लिश स्कूलजवळील शेरा पार्कमधील रहिवासी रेश्मा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील हॉलमध्ये असलेले १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, २० मणी असलेली सोन्याची पोत, सॅमसंग मोबाइल व २० हजार रुपयांची रोकड, असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आर्थिक व्यवहारावरून तिघा संशयितांची एकास मारहाण
नाशिक : आर्थिक व्यवहारावरून कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास जाखडीनगरमध्ये घडली़ कादिर हमीर पठाण असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे़
पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मतीन पापामियाँ शेख यांच्यासोबत आरो मशिन मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासंदर्भात आर्थिक व्यवहार झाला होता़ या कारणावरून तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीवरून कुरापत काढल्याने त्यास इंदिरानगर पोलीस ठाण्यात बोलावले होते़ मात्र, नळे मळ्याजवळ शेख व त्याच्या दोन साथीदारांनी पठाण यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली़ तसेच जिवे मारण्याची धमकी दिली़
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
हातउसनवार पैशातून एकास जबर मारहाण
नाशिक : टिपऱ्या बघण्यासाठी गेलेल्या अजय गोडसे या युवकास हातउसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून संशयित प्रशांत अशोक तोडकर (रा़ कुºहे चाळ, आदर्शनगर) याने शिवीगाळ व मारहाण करून डोेक्यास दगड मारून दुखापत केल्याची घटना गुरवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास रामवाडीतील आदर्शनगरमध्ये घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची अंगठी चोरली
नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वॅगन आर कारमध्ये आलेल्या तिघा संशयितांनी पादचारी दीपक सोनवणे (५१, साईसंपदा अपार्टमेंट, पंचवटी) यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी मंत्र मारून परत देतो असे सांगून पळून गेल्याची घटना पंचवटीतील आशादीप मंगल कार्यालयाजवळ घडली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सीबीएसवरून मोबाइलची चोरी
नाशिक : सिडकोतील सावतानगरमधील रहिवासी रमेश जेजूरकर यांचा महागडा मोबाइल फोन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी जुने सीबीएस परिसरातून चोरून नेल्याची घटना ६ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगाव परिसरातून दुचाकीची चोरी
नाशिक : धात्रक फाटा महालक्ष्मीनगरमील निळकंठ अपार्टमेंटमधील रहिवासी बाजीराव भवर यांची २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, बीपी ५७४९) चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ध्रुवनगरमधून दुचाकीची चोरी
नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगरमधील रहिवासी महेंद्र गवळी यांची ३५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (एमएच १५, एफआर ५५८२)चोरट्यांनी त्यांच्या साई तीर्थ सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड परिसरातून दुचाकीची चोरी
नाशिक : वडनेररोडवरील शिवनगरमधील रहिवासी सतीश राऊत यांची २५ हजार रुपये किमतीची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५, डीएक्स २२६५) चोरट्यांनी नाशिकरोडच्या रेजिमेंटल प्लाझाजवळून चोरून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़