बुधवारपासून फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. सातपूर विभागात फक्त ईएसआय रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली होती. लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला पहाटेपासून रांगेत उभे होते. सावलीची सोय नसल्याने जसजसे उन्हाचा तडाखा वाढू लागला तसतसे रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची घालमेल सुरू झाली. त्यात काही वयोवृद्ध व्याधीग्रस्त असल्याने त्यांना त्रास होऊ लागला. काही नागरिकांनी नगरसेवक सलीम शेख यांना संपर्क साधला. शेख यांनी लगेच केंद्रावर जावून पाहणी केली व अवघ्या काही वेळांतच केंद्रावर सावलीसाठी मंडपाची व्यवस्था केली. एवढेच नाही तर रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना चहापाणी आणि नाष्ट्याची सोय केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हायसे वाटले.
इन्फो===
ईएसआय रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनाने सावलीची सोय करणे गरजेचे होते. बऱ्याच नागरिकांना वयोमानानुसार आजार असल्याने त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे.
-सलीम शेख नगरसेवक. मनसे.
(फोटो १२ सातपुर)