पवननगर भाजी मार्केट समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:22 PM2019-11-08T23:22:43+5:302019-11-09T00:36:49+5:30
पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडत समस्या निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सिडको : पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडत समस्या निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सिडकोतील मुख्य भाग असलेल्या पवननगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जिजामाता भाजी मार्केट सुरू आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक गाळे असून, ग्राहकांची दररोज गर्दी असते. येथील व्यावसायिक व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरसेवक सुधाकर बडगुजर व महापालिका अधिकाºयांनी मार्केटची पाहणी केली. यावेळी व्यावसायिक व भाजीविक्रेत्यांनी समस्यांचा पाढा वाचला. शौचालय नसल्याने व्यावसायकिांना उघड्यावरच जावे लागते. भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता अतिक्रमणात जात असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढणेदेखील कठीण होत आहे. याबरोबरच भाजी मार्केटच्या आतील भागातही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. याभागात वाढते अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रोज छोटे-मोठे अपघात घडत आहे.
भाजी मार्केट परिसरात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समस्या सोडविण्याबाबत नगरसेवक व मनपा अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आप्पा नारायणे, शिवसिंग देवरे, राजेंद्र जपकाळ, नामदेव शिवदे, राजेंद्र पगार, सतीश काळे, नामेदव काळे, नीलेश वाणी, मोहन घुगे आदींसह व्यावसायिकांनी केली आहे.
भाजी मार्केटची पाहणी
पवननगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जिजामाता भाजी मार्केट सुरू आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक गाळे असून, ग्राहकांची दररोज गर्दी असते. येथील व्यावसायिक व परिसरातील नागरिकांना या ठिकाणी अनेक समस्या भेडसावत असून, याबाबत नगरसेवक सुधाकर बडगुजर व महापालिका अधिकाºयांनी मार्केटची पाहणी केली.