लोहोणेर येथे ग्रामनिधी मधूनपाच अपंगांना धनादेशा अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:53 PM2021-04-07T18:53:19+5:302021-04-07T18:57:57+5:30

लोहोणेर : ग्रामपंचायत लोहोणेर येथे ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधी मधून ५ अपंगांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशा अदा करण्यात आले.

Pay checks to five persons with disabilities from Gramnidhi at Lohoner | लोहोणेर येथे ग्रामनिधी मधूनपाच अपंगांना धनादेशा अदा

ग्रामनिधी मधून दिव्यांग निधीचे वाटप करतांना ग्रामपंचायत पदाधिकारी व लाभार्थी अपंग.

Next
ठळक मुद्दे विशाल देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

लोहोणेर : ग्रामपंचायत लोहोणेर येथे ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधी मधून ५ अपंगांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशा अदा करण्यात आले.

राहुल भिमराव निकम, सोमनाथ पेंगु पवार, मीना पुंडलिक धामणे, नटवरलाल सुंदरलाल राजपूत, विशाल बाळासाहेब देशमुख या पाच दिव्यांगाना अदा धनादेशाचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही लोहोणेर ग्रामपंचायतीने एक लाख ७० हजार रुपये इतर दिव्यांगाना धनादेशाद्वारे वाटप केले असून सुमारे एक लाख ९५ हजार रुपये आता पर्यत लोहोणेर ग्रामपंचायतीने वाटप केले असल्याचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सरपंच पूनम पवार, योगेश पवार, रमेश आहिरे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, सतीश देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, रामदास उशीरे, अशोक अलई, सुलतान शेख, संजय केले आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी दोन्ही डोळ्यानी अधू असलेले द्रुष्टीहीन मानस कॉम्पुटरचे संचालक विशाल बाळासाहेब देशमुख यांनी आपणास मिळालेला ५००० रुपयांचा दिव्यांग निधी राहुल निकम व मीना धामणे या गरजू अपंग व्यक्तींना विभागून देण्यात यावा असे जाहीर केल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 

Web Title: Pay checks to five persons with disabilities from Gramnidhi at Lohoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.