फिर्यादी रंजना दत्तात्रेय पवार (४७, रा.तुळजा भवानीनगर) या त्यांच्या मावस सासूला बुधवारी (दि.१०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिक्षामध्ये बसवून पुन्हा पायी घराकडे जात होत्या. यावेळी समर्थनगर कॅनॉलच्या बाजूला मंडलिक मळ्याजवळ त्यांच्या पाठीमागून दुचाकीने वेगात आलेल्या चोरट्यांनी ‘मावशी’ अशी हाक मारली. यावेळी पवार यांनी मान वळविली असता दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने ती खेचून पोबारा केला. सुदैवाने यावेळी पवार यांना जोराचा हिसका बसल्याने दुखापत झाली. चोरट्यांची मजल महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्यापर्यंत वाढल्याने पंचवटी, म्हसरूळ, मखमलाबादसह आडगाव आदि परिसरातील महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भागात सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामगिरीविषयी कमालीची नाराजी पसरली आहे. चोरट्यांनी या घटनेत सुमारे ११ ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पादचारी महिलेची दुचाकीस्वारांनी सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:15 AM