लासलगाव : लोकसहभागातून आमूलाग्र बदल घडून आलेल्या रायतेवस्ती येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी डिजिटल वर्गाचे उद्घाटन शिक्षण सभापती यतिन पगार व जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सभापती पंडितराव अहेर, बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, जि.प. सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, खडकमाळेगावच्या सरपंच तेजल रायते, राजेश पाटील, शिवा सुरासे, सोमनाथ पानगव्हाणे, प्रकाश दायमा उपस्थित होते. यावेळी बोलताना यतिन पगार यांनी शाळेत सुरू असलेल्या डिजिटल रचनावाद, लोकवाचनालय, काऊ चिऊचा खाऊ यासह विविध उपक्रमांचे कौतुक करून डिजिटल ई-लर्निंग शिक्षणाचे महत्त्व विशद केले. डी.के. जगताप यांनी पालक व ग्रामस्थांनी शाळेला केलेल्या सहकार्याचे कौतुक करून आवश्यक ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील बालकलाकारांनी मान्यवरांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमास उपसरपंच राजेंद्र रायते, सुरेश रायते, अनिल शिंदे, मोतीराम रायते, बापू राजोळे, वैशाली बाजारे, पोलीसपाटील, दत्ताकाका रायते, पंढरीनाथ रायते, बाबासाहेब रायते, प्रदीप माठा, व्ही.के. सानप उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश रायते यांनी केले. सूत्रसंचालन गोरख देवढे यांनी केले तर रमेश सावंत यांनी आभार मानले.
लोकसहभाग : सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार रायतेवस्ती शाळेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:17 AM