पेठ कॉँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:01 AM2020-03-03T00:01:35+5:302020-03-03T00:03:45+5:30
पेठ : सरकारी नोकरीत दलित, आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गावर केंद्र शासनाकडून अन्याय होत असून, आरक्षणाबाबतची भूमिका केंद्र शासनाने पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी पेठ तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

संसदेत आरक्षणाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला असता केंद्र सरकारने दिशाभूल करून आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रसंगी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भिका चौधरी, तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब शेख, विलास जाधव, चिंतामन खंबाईत, हरिदास भुसारे, संजय भोये, विकास सातपुते, हेमराज गावंढे, रामदास जाधव, ईश्वर दत्ता भुसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.