इगतपुरीसह पेठ, सुरगाण्यात ‘जोर’धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:46+5:302021-09-15T04:17:46+5:30

----------------------------------- घोटी : जिल्ह्यातील इगतपुरीसह पेठ सुरगाण्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जोर’धारेमुळे नद्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ ...

Peth with Igatpuri, ‘Jor’ edge in Surgana | इगतपुरीसह पेठ, सुरगाण्यात ‘जोर’धार

इगतपुरीसह पेठ, सुरगाण्यात ‘जोर’धार

Next

-----------------------------------

घोटी : जिल्ह्यातील इगतपुरीसह पेठ सुरगाण्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जोर’धारेमुळे नद्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाची सरासरीकडे वाटचाल सुरू आहे. मंगळवारी इगतपुरी (१५३.० मिमी), पेठ (१४९.७ मिमी) व सुरगाणा (७०.० मिमी) येथे मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा, कडवा भावली धरणातून विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील दारणा, भाम भावली नद्यांना पूरस्थिती आहे. दरम्यान, तालुक्यातील वैतरणा धरणही ओव्हरफ्लो झाले असून, या धरणातूनही तीन दरवाजे एक फुटाणे उघडण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत इगतपुरी, घोटीकरांना पावसाने चांगलेच झोडपले.

इगतपुरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, या पावसाने सरासरीकडे वाटचाल झाली आहे. तालुक्यात दारणा, भाम, भावली, कडवा ही धरणे यापूर्वीच ओसंडून वाहत असून, आता त्यात वैतरणा धरणाचीही भर पडली आहे. आज सकाळीच ११७०० दलघफु क्षमता असलेले वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इगतपुरी तालुक्यात चोवीस तासांत १५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सततच्या पावसाने दारणा, भाम, भावली नद्यांना पूरस्थिती आहे. आता वाकी व मुकणे धरणातही जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाकी धरण ७३ टक्के भरले आहे, तर मुकणे धरणसाठा ७१ टक्क्यांवर आला आहे.

--------------------------

इगतपुरी तालुक्यात यावर्षी उशिराने का होईना; परंतु समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्याची वाटचाल सरासरीच्या दिशेने आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत २९४२ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत इगतपुरी तालुक्यात ९६ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली.

----------------------------------

इगतपुरी तालुक्यात ओव्हरफ्लो झालेली धरणे

मुकणे - ५१४७ दलघफू जलसाठा, ७१ टक्के

वाकी - १८३७ दलघफू जलसाठा, ७३ टक्के

दारणा धरण ६९७३ (ओव्हरफ्लो) - विसर्ग १२७८८ क्युसेक

भावली - ओव्हरफ्लो- ९४८ क्युसेक विसर्ग

भाम - ओव्हरफ्लो - ४१८० क्युसेक विसर्ग

कडवा ओव्हरफ्लो - ८४८० क्युसेक विसर्ग

------------------------------

आज मंडलनिहाय झालेला पाऊस

इगतपुरी १५३.०० मिमी

घोटी १०३. ६० मिमी

धारगाव ७५.०० मिमी

वाडीव-हे २७.४० मिमी

नांदगाव बु. २८.०० मिमी

टाकेद - २९.०० मिमी

-------------------------------------

इगतपुरी तालुक्यातील मणिकखांबजवळील दारणा नदी तुडुंब भरून ओसंडून वाहत असून, नदीजवळच्या शेतात पाणीच पाणी झाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता.

(१४ दारणा बेस्ट १/२/३)

140921\14nsk_19_14092021_13.jpg

१४ दारणा बेस्ट १

Web Title: Peth with Igatpuri, ‘Jor’ edge in Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.