आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 03:46 PM2020-08-04T15:46:01+5:302020-08-04T15:46:45+5:30

लखमापूर : दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा इ. तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेला ही आढावा बैठक आशादाई ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

The picture is hopeful because of the review meeting | आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई

आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई

googlenewsNext
ठळक मुद्देदिंडोरी : औद्योगिक क्षेत्राचे चक्र फिरण्याच्या मार्गावर

लखमापूर : दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा इ. तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेला ही आढावा बैठक आशादाई ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील रग्ण कधी जास्त तर कधी कमी अशी आकडेवारी समोर येत आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील सर्वच आर्थिक क्षेत्रावर संकटाची कुराड कोसळली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग, विविध कंपन्यातील कामगार वर्ग, विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, व्यावसायिक, व्यापारी आदी क्षेत्रातील सर्वच आर्थिक संकटात सापडले आहे.
याच धर्तीवर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेऊन दिंडोरी तालुक्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तालुक्यातील कृत्रिम संकटात सापडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेले चक्र पुन्हा फिरण्याच्या मार्गावर दिसत आहे. त्यादृष्टीने सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीत दिंडोरी, कळवण ,पेठ, सुरगाणा आदी भागातील समस्या कश्या प्रकारे दुर करता येतील. याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहे.

Web Title: The picture is hopeful because of the review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.