हिरावाडी भागात कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:36 AM2019-10-24T00:36:19+5:302019-10-24T00:36:53+5:30
महापालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केली असली तरी सध्या घंटागाडी ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागत आहे.
पंचवटी : महापालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केली असली तरी सध्या घंटागाडी ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर फेकावा लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला कचरा साचून राहत असल्याने परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दोन दिवसांवर दीपावलीचा सण असून त्यानिमित्त नागरिकांनी घरात साफसफाईचे काम सुरू केले आहे. परिणामी कचºयाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न मिळाल्याने शेकडो कर्मचाºयांनी आंदोलन करून घंटागाड्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे कचºयाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. घंटागाडी वेळेत येत नसल्याने रस्त्यावर कचरा पडून असतो त्यातच मोकाट जनावरे साचलेला कचºयाभोवती अन्नाच्या शोधात कचरा पांगवित आहे. घंटागाडी ठेका महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाºयाकडे असल्याने मनपा प्रशासन कारवाईसाठी विलंब करत असल्याचा खुलासा पालिकेच्या कर्मचाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे, तर दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पावसाची रिमझिम सुरू असून, त्यातच थंडी, ताप, खोकला या आजारांनी नागरिक त्रस्त झालेले असताना परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या कचºयामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. तसेच घंटागाडी ठेकेदार सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्याने महापालिका प्रशासन कारवाई करण्यास विलंब करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हिरावाडीतील मनपा क्र ीडा संकुलालगत गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकलगत तसेच जॉगिंग ट्रॅकवर खरकटे अन्न व कचरा टाकणाºया बेशिस्त नागरिकांवर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरात राहणाºया नागरिकांनी विशेषत: दैनंदिन सकाळी फिरण्यासाठी येणाºया जॉगर्सने केली आहे.
जॉगिंग ट्रॅकलगत कचरा खरकटे अन्न टाकल्यामुळे मोकाट कुत्र्यांचादेखील उपद्रव वाढत चालला आहे, परिणामी रोज सकाळच्या सुमारास ट्रॅकवर फिरणाºया नागरिकांवर मोकाट श्वान भुंकत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. कचरा पडून राहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो महापालिका प्रशासनाने बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय जॉगिंग ट्रॅकलागत काही काटेरी झाडाच्या फांद्या वाढलेल्या असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होतो महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाच्या वतीने शुक्र वारी फांद्या छाटण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांना परिसरात राहणाºया काही नागरिकांनी आडकाठी करून दमदाटी केल्याचा प्रकार घडल्याचे समजते.
मोकाट श्वानांचा उपद्रव
मनपाने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचादेखील उपद्रव वाढला आहे. ट्रॅकवर पथदीप व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारातच मार्गक्रमण करावे लागते. ट्रॅकवर फिरणाºया नागरिकांवर श्वान भुंकत असल्याने नागरिकांना हातात दगड घेऊन मार्गक्र मण करावे लागते. याशिवाय काही बेशिस्त महिला सकाळच्या सुमाराला पाळीव श्वान ट्रॅकवर घेऊन फिरत असतात यामुळे नागरिकांना त्रास होतो.
जॉगिंग ट्रॅकवर घाणीचे साम्राज्य
पंचवटी परिसरातील सर्वांत मोठा मातीचा जॉगिंग ट्रॅक मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केला आहे. या ट्रॅकवर दैनंदिन सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात जॉगिंग ट्रॅकलगत नागरी वसाहत असून, या वसाहतीतील कमलेश्वर महादेव मंदिरजवळ राहणारे नागरिक कधी ट्रॅकवर व कधी ट्रकला लागून असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ खरकटे अन्न आणि केरकचरा आणून टाकतात तर काही नागरिक झाडांचा पालापाचोळा जाळतात परिणामी परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरते.