देवळाचापाडा येथील रुग्णांचा डोलीतून प्रवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:26 PM2020-09-07T14:26:46+5:302020-09-07T14:29:45+5:30
पेठ : तालुक्यातील कहांडोळपाडा पैकी देवळाचापाडा येथील नागरिकांना दळणवळणासह आरोग्य व संपर्क सुविधांचा अभाव असल्याने रूणांना डोलीच्या सहाय्याने रु ग्णालयात न्यावे लागत असून ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला.
लोकमत न्यूज नेटवर्क

दमणगंगा नदीच्या काठावर खोल दरीत वसलेल्या या अतिदुर्गम पाड्यापर्यंत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे वाहन पोहचत नसल्याने अचानक कोणाची तब्बेत बिघडल्यास ७ ते ८ किलोमीटर तोंडवळ पर्यंत रु ग्णाला डोली करून डोंगर चढून आणावे लागते. अशा परिस्थितीत अत्यवस्थ रु ग्ण दगावण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत असून गावाच्या आसपास कोणत्याही दुरसंचार कंपनीचा मनोरा नसल्याने रात्री अपरात्री दूर्घटना घडल्यास कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही.
आरोग्य सुविधांचा अभाव असून सोमवारी (दि.७) या संदर्भात आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी तहसीलदार संदिप भोसले यांची भेट घेऊन गावातील अनेक समस्या कत्रन केल्या. निवेदनावर गणेश गवळी, अशोक गवळी, नेताजी गावीत, अंकूश चौधरी, गणेश सातपूते, सुरेश चिखले, भिवा भांगरे, युवराज चिखले, रमेश पवार, रमेश भांगरे यांचे सह ग्रामस्थांच्या सहया आहेत..