पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन आठवडे भरातच पिंपळगावची कोरोना बाधितांची संख्या २६ वर पोहचली तर परिसरात देखील कोरोनाने थैमान घातला आहे शिरवाडे वणी व शिरसगाव त्याबरोबर आहेरगावतही ६ रु ग्ण आढळल्याने पिंपळगाव व परिसर दिवसेंदिवस कोरोनाचा हॉस्पॉट बनत चालला आहे.अधिक माहिती आधी की, शहरात बुधवारी (दि. २४) रोजी ५ रु ग्णाचा अहवाल कोरोना बाधित असल्याने रु ग्णांची संख्या २५ झाली होती त्यातच गुरु वारी दुसऱ्याही दिवशी ५५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना संक्रमित आल्याने रु ग्ण संख्यात वाढ होऊन शहरातील रु ग्णसंख्या २६ वर पोहचली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू, तर पाच पूर्णपणे बरे झाले आहे. पण शहरात लागोपाठ दिवसेंदिवस रु ग्ण वाढत असल्याने पिंपळगाव शहर कोरोनाचा हॉस्पॉट झाला आहे. लोकांप्रमाणेच प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळगाव कोरोनाचा हॉस्पॉट ; रु ग्ण संख्या २६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:41 PM
पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन आठवडे भरातच पिंपळगावची कोरोना बाधितांची संख्या २६ वर पोहचली तर परिसरात देखील कोरोनाने थैमान घातला आहे शिरवाडे वणी व शिरसगाव त्याबरोबर आहेरगावतही ६ रु ग्ण आढळल्याने पिंपळगाव व परिसर दिवसेंदिवस कोरोनाचा हॉस्पॉट बनत चालला आहे.
ठळक मुद्दे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण