नाशकात आयएमएतर्फे पिंक हेल्थ प्रोजेक्टला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:30 PM2018-08-31T17:30:53+5:302018-08-31T17:31:12+5:30

या प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार

Pink Health Project launches by IMA in Nashik | नाशकात आयएमएतर्फे पिंक हेल्थ प्रोजेक्टला प्रारंभ

नाशकात आयएमएतर्फे पिंक हेल्थ प्रोजेक्टला प्रारंभ

Next
ठळक मुद्देया प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार

नाशिक - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे जिल्हयाभरातील विद्यार्थीनींसाठी ‘मिशन पिंक हेल्थ प्रोजेक्ट’ला प्रारंभ झाला असून पुढिल तीन महिने हा प्रोजेक्ट राबविला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली.
या प्रोजेक्ट अन्वये इयत्ता ७वी ते १०वी या वयोगटातील शासकीय व बिगर शासकीय शाळेतील विद्यार्थींनींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १००० मुलींच्या आरोग्याची अत्याधुनिक हिमोग्लोबिन तपासणी मशिनद्वारे तपासणी करण्यात आली आहे. इतर तपासण्यांबरोबरच मुलींना ‘अ‍ॅनिमियामुक्त भारत’, ‘बेटी बचाव’,‘आओ गाव चले’ या नारा देत मार्गदर्शन केले जात आहे. या प्रोजेक्टसाठी नाशिक आयएमए अंतर्गत मिशन पिंक हेल्थ विंगने शहरातील स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथालॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ यांचा सहभाग असलेले ग्रुप बनविले आहे. या प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. संपुर्ण जिल्हाभरात ही मोहिम राबविली जाणार आहे. यात अ‍ॅनिमिया असणाऱ्या मुलींना रक्तवर्धक गोळ्या व पुरक आहार देण्यात येणार आहे. मुलींना आदर्श आहाराची माहिती दिली जाणार आहे. आहाराअभावी होणाºया परिणामांची कल्पना त्यांना देण्यात येणार आहे. ३ महिन्यानंतर या मोहिमेचे फलित आकडेवारीसह प्रसिद्ध केले जाणार आहे. याप्रसंगी आयएमएचे अद्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. राजश्री पाटील, डॉ. कविता गाडेकर आदि उपस्थित होते.

Web Title: Pink Health Project launches by IMA in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.