हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीची मागणी
By admin | Published: January 10, 2015 11:07 PM2015-01-10T23:07:11+5:302015-01-10T23:07:28+5:30
हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीची मागणी
कनाशी : सुरगाणा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्षेत्रातील हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर सर्वत्र खडी उखडल्याने वाहन चालविणे कसरतीचे ठरत आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
सुरगाणा सार्वजनिक बांधकाम उपविभागांच्या कार्यक्षेत्रातील हतगडबारी राज्य महामार्ग २०ची दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे सदर विभाग एक वर्षापासून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणे मुश्कील झाले आहे.
एक वर्षापूर्वी सदर बारीचे घाट कटिंग करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे अवजड वाहने नेणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते, परंतु एक वर्षापासून सदर विभागाने घाट कटिंगचे काम झाल्यानंतर जाड खडीकरण करण्यात आले.
काही महिन्यात खडी उखडण्यास सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र
खडी रस्त्यावर पसरलेली आहे. संबंधित विभागाला खडीवर डांबर टाकण्याचा विसर पडला की
काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)