भाजीविक्रेत्यांसाठी जागेची आखणी
By admin | Published: September 28, 2016 01:20 AM2016-09-28T01:20:09+5:302016-09-28T01:21:04+5:30
सातपूर भाजी मंडई : रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना
सातपूर : गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रे त्यांना मंडईत स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून पूर्व तयारी केली जात असून, मंगळवारी (दि.२७) संबंधित जागेची मोजणी करून आखणी करण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेत रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण हटविण्याची मागणी केली होती. या विक्रे त्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा, अशी विक्रे त्यांची मागणी होती. सणासाठी बसणाऱ्या विक्रे त्यांनाही मंडईत बसविण्यात यावे, पार्किंगची सोय करावी, मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी यांसह विविध मागण्याही विक्रेत्यांनी केल्या होत्या. विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना निर्देशित केले. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी मंडईतील अतिरिक्त जागेची मोजणी करून जागेची आखणी करण्यास सुरु वात केली आहे. आखणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाजीविक्रे त्या व्यावसायिकांकडूनही सहकार्य केले जात आहे. (वार्ताहर)