दिवगंत कोविड योध्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:20 AM2021-08-11T01:20:15+5:302021-08-11T01:20:42+5:30

कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करण्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनीदेखील योगदान दिले आहे. जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या ज्या शिक्षकांचे मृत्यू झाले त्यांच्या स्मरणार्थ महापालिका शिक्षक सेनेच्या वतीने प्रेरणा दिवस म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation in memory of the late Kovid warriors | दिवगंत कोविड योध्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

दिवगंत कोविड योध्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

Next

नाशिक- कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करण्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनीदेखील योगदान दिले आहे. जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या ज्या शिक्षकांचे मृत्यू झाले त्यांच्या स्मरणार्थ महापालिका शिक्षक सेनेच्या वतीने प्रेरणा दिवस म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. महापालिकेच्या शाळा क्रमांक ७१ मध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षक सेनेचे संपर्कप्रमुख संजय बच्छाव, राजेश दाभाडे, सचिन चिखले, जयंत येवला, मुख्याध्यापिका वैशाली ठाेके, वंदना आरसुळे, मुख्याध्यापक शिरोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोनाकाळात राजेंद्र म्हसदे, गोविंद पवार, शैला अढांगळे, केशव चौधरी यांच्या स्मरणार्थ केवळ याच शाळेत नाही तर सिडको आणि सातपूरमधील महापालिका शाळांमध्येही वृक्षारोपण करण्यात आले.

---

 

Web Title: Plantation in memory of the late Kovid warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.