उपनगरमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:08+5:302021-06-09T04:17:08+5:30
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपनगरमधील मातोश्री नगर येथे प्रभाग क्र. १६च्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात ...
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपनगरमधील मातोश्री नगर येथे प्रभाग क्र. १६च्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पिंपळ, उंबर, कडुनिंब, वड व इतरही औषधोपयोगी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. कोरोना जागतिक महामारी काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे होणारी प्राणहानी टाळायची असल्यास वृक्षसंपदा उपयुक्त ठरणार असून ते नैसर्गिक प्राणवायूचे स्त्रोत आहेत. त्यात वड, पिंपळ, कडुनिंब ही झाडे फार महत्त्वाची आहेत. हे अनुसरून प्रभाग १६ येथील महापालिका मोकळ्या जागेत प्रत्येक आठवड्यात वृक्षारोपण केले जाणार आहेत. १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम प्रभागात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरी विविध वनस्पती आणि औषधोपयोगी झाडांची लागवड करायची असेल, त्यांना युगांतर सोशल फाऊंडेशनतर्फे संरक्षक जाळ्या व विविध नैसर्गिक रोपे यांचा पुरवठा करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी युगांतर सोशल फाऊंडेशन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष रवी पगारे यांनी केले. वृक्षारोपणप्रसंगी माधवी पारख, कमलेश पारख, संदीप जाधव, कमलेश सूर्यवंशी, किर्ती सूर्यवंशी, कुणाल पगारे आदी उपस्थित होते. नागरिकांना रोपे, संरक्षक जाळ्या व इतर साहित्य पाहिजे असल्यास ८६६९९९८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.