खामखेडा : कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.डिसेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातील तीन दिवस रात्री ९.३० ते सकाळी ७.३० असा वीज पुरवठ्याच धोरण राबवल्याने येन उन्हाळ कांदा लागवडीच्या कालावधीत शेतकऱ्यांची थट्टा केली. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीना निवेदने देत वेळ बदलण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे आठवड्यातील फक्त चारच दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याने या कालावधीतच फक्त कांदा लागवड करता येते. रात्रीच्या वेळेत वीज असलेल्या दिवशी मात्र शेतकऱ्यांना लागवड करता येत नाही.त्यातच यावर्षी शेतकऱ्याची कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झालीत. काहींनी दुबार तर काहींनी तिबार रोप टाकलीत. महागडी रोप असल्याने त्याची वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नसल्याने व ढगाळ वातावरणाने लागवडीला आलेली रोपे खराब होत असल्याने रात्रीची जोखीम पत्करून या कडाक्याच्या थंडीत अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करावी लागत आहे.रात्रीच्या वेळेस वीज असलेल्या दिवशी शेतकरी शेतात विजेची व्यवस्था करत कांदा लागवडीची तजवीज करत कांदा लागवड करत आहे. मजूर रात्रीच्या वेळी कांदा लागवडीला जुमानत नाहीत. मात्र विजेअभावी अधिकची मजुरी देत शेतकऱ्यांना सध्या लागवड उरकावी लागत आहे.किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पुर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेऊन शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबवावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या बाबतीत कुठलाच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांची पिळवणूकच वीज वितरण कंपनी करत असल्याचे चित्र विदारक आहे.- किशोर चव्हाण, तालुकाध्यक्ष, भाजपाभारनियमनाच्या चुकीची वेळ कांदा लागवडीसाठी अडचणीची ठरत आहे. महागडी कांदा रोपे तसेच मजूर टंचाई यामुळे सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूकच होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचे होत असलेले हाल पहावेत.- संदीप मोरे, शेतकरी, खामखेडा.
चुकीच्या भारनियमनामुळे रात्रीची कांदा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 5:16 PM
खामखेडा : कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ठळक मुद्देखामखेडा : कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना करावी लागते धडपड