नाशिक : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी पंचवटी परिसरातील हातगाडीचालक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होऊन प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कारवाई करणार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.आठवडे बाजार असो की रस्त्यावर दैनंदिन भरणारा भाजीबाजार, या ठिकाणी सर्रासपणे ग्राहकांना भाजीपाला तसेच फळे खरेदी केल्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जातात. हॉटेलमध्येही अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे दिसून येते. प्लॅस्टिक पिशव्या लवकर नष्ट होत नाहीत शिवाय प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला मोठा धोका पोहचत असल्याने यांचा वापर टाळावा, असे आवाहन विविध पर्यावरणप्रेमी संघटना तसेच प्रशासनाकडून केले जात असले तरी विविध व्यावसायिकांकडून पालिकेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या शहरासह पंचवटी परिसरात दिसून येते.महापालिकेच्या संबंधित विभागाकडून विविध हातगाडीधारकांवर कारवाई केली जाते, परंतू प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या पंचवटी विभागाकडून प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाई करण्यात येऊन शेकडो किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. असे असले तरी पंचवटीत पुन्हा प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर विविध व्यावसायिकांकडून केला जात असल्याने पालिका प्रशासनही हतबल झाल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या पंचवटी भागात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 4:48 PM
नाशिक : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी पंचवटी परिसरातील हातगाडीचालक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होऊन प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कारवाई करणार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.आठवडे बाजार असो की रस्त्यावर ...
ठळक मुद्दे महापालिकेचे दुर्लक्षहातगाड्यांसह हॉटेलचालकांकडून कायद्याची पायमल्ली