मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:34 PM2020-08-18T22:34:36+5:302020-08-19T00:52:33+5:30

मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे.

The plastic industry in Malegaon is in turmoil | मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

googlenewsNext
ठळक मुद्देहजारो कामगार बेरोजगार : २५० कारखाने वर्षभरापासून बंद; हरित लवादाच्या वादात आर्थिक संकट

शफीक शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे.
उद्योग शहरातील असंख्य प्लॅस्टिक उद्योजक नाशिकसह राज्यात इतरत्र स्थलांतर करीत आहेत. मालेगाव शहरात सुमारे २५० प्लॅस्टिक कारखाने असून, वर्षभरापासून बंद आहेत. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला नुकसान होत असल्याने सर्व कारखाने बंद असून, सुमारे ८० हजार कामगार बेरोजगार झाले आहे.
हरित लवादाच्या आदेशामुळे प्लॅस्टिक उद्योगावर प्रदूषणाची तलवार लटकत आहे. नागपूरच्या ‘निरी’ संस्थेतर्फे शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांचे टेस्टिंग करण्यात आले. त्याचे अहवाल आले असून, प्लॅस्टिक कारखान्यांमुळे प्रदूषण होत नाही, असा अहवाल दिल्याचे प्लॅस्टिक उद्योजक मुकेश झुनझुनवाला यांनी सांगितले. शहरातील प्लॅस्टिक कारखानदारांनी वर्षभरापासून महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण महामंडळास कागदपत्रांची पूर्तता करून दिली; मात्र तरीही कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे प्लॅस्टिक कारखानदार उद्योजक ‘हतबल’ झाले आहे.पर्यावरणपूरक उद्योग बंद; इतर शहरात स्थलांतरमहाराष्टÑात जळगाव, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्लॅस्टिक कारखाने सुरू असून, केवळ मालेगावी बंद आहे. औद्योगिक वसाहतीत सर्व प्लॅस्टिक कारखाने हलविण्याची तयारी उद्योजकांची आहे. तसे लिहून दिले आहे. तरी कोणतीही सवलत मिळत नाही. यापूर्वी महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रा.पं. हद्दीत कारखाने होते. हद्दवाढीनंतर ते मालेगावात आले आहेत. वाढीव क्षेत्राचे डीपी प्लॅन अजून तयार नाही. सर्व कारखानदारांकडे ग्रा.पं.ची पूर्वपरवानगी असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकांची परवानगी घेण्यास सांगत आहे.
मालेगावातील प्लॅस्टिक पाइप महाराष्टÑासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणापर्यंत विक्रीसाठी पाठविले जात. प्लॅस्टिकपासून चपला, बुटांचे सोल, डबे, स्कूल बॅग, सुटकेस, बाटल्या, डबे, कॅरेट, शेतोपयोगी साहित्य, पाइप बनविले जात. सुमारे
३५ वर्षांपासून सुरू असलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग अखेरची घटका मोजत आहे.
एका प्लॅस्टिक कारखान्यासाठी २० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते; मात्र उद्योग बंद असल्याने पुणे, नाशिकसह गुजरात राज्यात स्थलांतरित होत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक शहरात प्लॅस्टिक उद्योग सुरू असताना मालेगावात पर्यावरणपूरक उद्योग बंद आहेत.

Web Title: The plastic industry in Malegaon is in turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.