नाशिक : प्लॅस्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता या निर्णयाला किमान महिनाभरासाठी स्थगिती द्यावी यासाठी राज्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ सोमवारी (दि.२) मुंबई येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना भेटणार आहेत.महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता कदम यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक कॅरिबॅगच्या उत्पादने आणि विक्रीवर बंदी घातल्याने अडचण निर्माण झाली असून वितरकांनी अनेक ठिकाणी बंद आंदोलन सुरू केले आहे, तर राज्यात अनेक उद्योग बंद पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आधी प्लॅस्टिक कॅरिबॅगला पर्याय द्या, त्यासाठी महिनाभराची स्थगिती शासन निर्णयाला द्यावी यासाठी कदम यांची भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लॅस्टिकबंदीच्या स्थगितीसाठी आज साकडे घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:17 AM