पिंपळगावी तृतीयपंथियांकडून शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:34 PM2019-07-03T17:34:05+5:302019-07-03T17:35:16+5:30
पिंपळगाव बसवंत : कांदा भाव तेजीत असल्याने तृतीयपंथियांकडून पिंपळगाव बाजार समितीत येणा-या शेतकऱ्यांच्या वाहनातून प्रत्येकी ५ किलो कांदे बळजबरीने काढत लूट सुरू असल्याच्या पोस्टसह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र याबाबत पिंपळगाव बाजार समितीकडे अद्याप एकही तक्र ार दाखल नसून हे बाजार समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगत या प्रकाराचा इन्कार केला आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये पिंपळगाव बाजार समितीत तृतीयपंथी बळजबरीने शेतक-यांच्या वाहनांतून प्रत्येकी ५ किलो कांद्याची लूट करीत असल्याचे दिसत आहे. बाजार समितीत रोज ३०० पिकअप व ३५० ट्रॅक्टर येत असल्याने प्रत्येक वाहनांतून ५ किलो कांदे तृतीयपंथियांकडून कााढले जातात. त्यामुळे शेतक-यांची रोज किमान तीन हजार किलो कांद्याची लूट होत असल्याने महिनाभरात जवळपास ७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. तृतीयपंथी बाजार समितीत येतात कसे असा प्रश्न उपस्थित करीत त्यांचा तातडीने बंदोबस्त करुन शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा असे पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र या प्रकाराचा बाजार समितीच्या सूत्रांनी इन्कार केला आहे.