व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये पिंपळगाव बाजार समितीत तृतीयपंथी बळजबरीने शेतक-यांच्या वाहनांतून प्रत्येकी ५ किलो कांद्याची लूट करीत असल्याचे दिसत आहे. बाजार समितीत रोज ३०० पिकअप व ३५० ट्रॅक्टर येत असल्याने प्रत्येक वाहनांतून ५ किलो कांदे तृतीयपंथियांकडून कााढले जातात. त्यामुळे शेतक-यांची रोज किमान तीन हजार किलो कांद्याची लूट होत असल्याने महिनाभरात जवळपास ७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. तृतीयपंथी बाजार समितीत येतात कसे असा प्रश्न उपस्थित करीत त्यांचा तातडीने बंदोबस्त करुन शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा असे पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र या प्रकाराचा बाजार समितीच्या सूत्रांनी इन्कार केला आहे.
पिंपळगावी तृतीयपंथियांकडून शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 5:34 PM