पंचवटी : नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन अद्याप बँकेत जमा न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. चालू महिन्याची २० दिवस उलटूनदेखील वेतन न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागत असल्याचे खुद्द पोलीस कर्मचाºयांनी बोलून दाखविले आहे.सातव्या वेतन आयोगाचे काम सुरू असल्याने शेकडो पोलीस कर्मचाºयांना एप्रिल महिन्याचा पगार झालेला नाही, येत्या काही दिवसांनी शाळा, महाविद्यालय सुरू होऊन त्यांच्या पाल्यांचे प्रवेश क्लास फी, शालेय फी, यासाठी पोलीस कर्मचाºयांना पैशांची गरज भासणार आहे.एप्रिल महिन्याचे वेतन मे महिन्याचा तिसरा आठवडा लोटल्यानंतरदेखील न झाल्याने पोलीस कर्मचारी काहीसे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.मे महिना संपत आला तरी वेतन झालेले नसल्याने बहुतांशी पोलीस कर्मचाºयांना खिशात पन्नास-शंभर रु पये घेऊन फिरावे लागत असल्याची खंत पोलीस कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. सातव्या वेतन आयोगाचे काम सुरू असल्याने सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे एप्रिल महिन्याचे मासिक वेतन रखडले असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले.
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:16 AM