भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

By Admin | Published: November 12, 2016 10:17 PM2016-11-12T22:17:03+5:302016-11-12T22:22:05+5:30

भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

Police Reconnaissance Three Documents of Land Records | भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

googlenewsNext

 सिन्नर : मोजणी नकाशा देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून बारा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भूमिअभिलेख खात्याच्या उपअधीक्षकांसह तिघांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही संशयिताना चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत
(दि. १५) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिन्नर येथील एका शेतकऱ्याने शिवारातील गट क्रमांक ७३५ (९९०) मधील त्याच्या पोटहिश्शाची १ हेक्टर ९३ आर जमीन विक्रीसाठी काढली होती. सदर जमिनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने तालुका भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. भूमिअभिलेख कार्यालयाकडून सदर जमिनीची मोजणी पूर्ण झाली होती. मोजणी नकाशाची प्रत देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील संशयित शिरस्तेदार सुरेश चंद्रकिशोर रगडे व लिपिक भगीरथ जिभाऊ चव्हाण यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपये घेतले होते. त्यास उपअधीक्षक पांडुरंग नरहरी सानप यांनी समंती दिली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून या तिघा संशयिताना रंगेहात पकडले होते. रात्री उशिरा सिन्नर पोलीस ठाण्यात या तिघा संशयितांविरोधात लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या तिघा संशयिताना मंगळवारपर्यंत (दि. १५) पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कल्पक निंबाळकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Police Reconnaissance Three Documents of Land Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.