कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:10+5:302021-04-04T04:14:10+5:30

मालेगाव : ग्रामीण भागातील ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी. ग्रामीण ...

Police should increase patrols in villages with high Corona population | कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी

कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी

Next

मालेगाव : ग्रामीण भागातील ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी. ग्रामीण भागातील गृह विलगीकरणातील रुग्णांची यादी आरोग्य प्रशासनाने पोलीस प्रशासनास देऊन अशा रुग्णांवर वचक बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत

शहरासह ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असून, त्याला रोखण्यासाठी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, तहसीलदार चंद्रजित राजपुत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा गावातील परिस्थितीचा विचार करून गावपातळीवर कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न होण्याबरोबरच तालुक्यात रेमडेसिवीरचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा. सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन टँक तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. प्राथमिक पातळीवर नागरिकांनी उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन करतानाच शिस्त व आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही, असेही मंत्री भुसे या वेळी म्हणाले.

---------------------

स्ट्राँग प्रतिबंधित क्षेत्र गरजेचे : गमे

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्राँग प्रतिबंधित क्षेत्र गरजेचे आहे. यासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबरोबर कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे असून, यातूनच कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला. शहरासह ग्रामीण भागातील सर्व प्रतिबंधित क्षेत्रांत तत्काळ बॅरेकेटिंग करण्याच्या सूचना देताना आयुक्त गमे म्हणाले, प्रत्येक बॅरेकेटिंग केलेल्या भागात सूचनांचे दर्शनी फलक लावण्यात यावेत. या भागातील नागरिकांचा संचार तत्काळ थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी. प्रत्येक बाधित रुग्णामागे त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून अँटीजन चाचण्यांवर भर देण्यात यावा.

--------------------

एचआरसीटी सेंटरच स्प्रेडिंग सेंटर होऊ नये : मांढरे

आरटीपीसीआर व अँटीजन चाचणी केल्यानंतरही काही लोक एचआरसीटी चाचणी करण्यासाठी आग्रही असतात, यामुळे एचआरसीटी सेंटरच स्प्रेडिंग सेंटर होऊ नये, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी चाचण्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. गतवर्षी कोरोना रोखण्यासाठी मृत्यूची भीती काम करीत होती, तर आता यंत्रणेला काम करावे लागेल. यासाठी आरोग्य प्रशासनातील कामाचा विलंब टाळण्यासाठी डॉ. हितेश महाले यांना अधिकार प्रदान करण्यासाठी आदेश निर्गमित करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

-------

प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

विभागीय आयुक्त गमे व जिल्हाधिकारी मांढरे यांनी शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर सहारा रुग्णालयासह दाभाडी येथील कोविड रुग्णालयाची पाहणी करून दाभाडी गावातील प्रतिबंधित क्षेत्रातील गृह विलगीकरणातील महिला रुग्णांशी संवाद साधत त्यांची नियमित तपासणीसह औषधोपचाराबाबत माहिती जाणून घेतली.

--------------

मालेगावी शासकीय विश्रामगृहावर कोरोना रोखण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील आदी. (०३ मालेगाव १)

===Photopath===

030421\03nsk_1_03042021_13.jpg

===Caption===

०३ मालेगाव १

Web Title: Police should increase patrols in villages with high Corona population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.