पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये ८९ गुन्हेगारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 07:31 PM2020-02-19T19:31:11+5:302020-02-19T19:34:58+5:30

८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही

Police take action on 19 criminals in 'Mission All Out' | पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये ८९ गुन्हेगारांवर कारवाई

पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये ८९ गुन्हेगारांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे२६ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई नाकाबंदीदरम्यान ३३६ संशयास्पद वाहने तपासण्यात आलीफरार ११पैकी एकही संशयित हाती लागला नाही

नाशिक : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुर्वसंध्येला मंगळवारी (दि.१८) मध्यरात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यावेळी पोलिसांच्या यादीवरील १२९ सराईत गुन्हेगारांपैकी ८९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तसेच ६२ तडीपार गुंडांचे ठावठिकाणे तपासले असता तेदेखील हद्दीत मिळून आले नाही.
शहरात कुठल्याहीप्रकारे सार्वजनिक सण-उत्सवांना गालबोट लागू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिमंडळ-१ व २मध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले. यावेळी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची तपासणी तसेच हॉटेल, लॉज,ढाबे, धर्मशाळा, गुन्हेगारांचे अड्डे, टवाळखोर, ट्रीपलसिट रायडर्स, कागदपत्रे जवळ न बाळगता वाहने चालविणारे, मद्यपी वाहनचालक अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीवर नांदूरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ, गरवारे पॉइंट, एक्स-लो पॉइंट, बडदेनगर, संसरीनाका, शालिमार आदि ठिकाणी चोख नाकाबंदी करण्यात आली. यावेळी नाकाबंदीदरम्यान ३३६ संशयास्पद वाहने तपासण्यात आली. यापैकी २६ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन ५ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर तसेच परिसरात टवाळ्या करणा-या ८४ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. २६ झोपडपट्टयांची तपासणी करण्यात आली. ८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही. या मोहिमेत ४उपायुक्तांसह ७ सहायक आयुक्त, १७निरिक्षक, ३१सहायक निरिक्षक/उपनिरिक्षक, ११७कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Police take action on 19 criminals in 'Mission All Out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.