नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीवर पोलिसांचा ह्यवॉचह्ण राहणार आहे. दोन्ही वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, महाराष्ट्रातही कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. सुदैवाने नाशिकमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क व सॅनिटायझरचा बाजरात कृत्रिम तुटवडा भासवून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकात सहा कर्मचारी असणार आहेत. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, हवालदार, शिपाई आदींचा समावेश आहे. दरम्यान, भरारी पथकांना दैनंदिन कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीवर पोलिसांचा 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 3:19 PM
काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देकाळाबाजार रोखण्यासाठी पाच भरारी पथकांची स्थापनाभरारी पथकात सहा कर्मचारी असणार