शहरातील रस्ते दुभाजकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:40 AM2020-12-11T04:40:45+5:302020-12-11T04:40:45+5:30

रस्त्यावरच पार्किंग शरणपूर रोड : शहरात दुचाकींची संख्या वाढल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शरणपूर ...

Poor condition of city road dividers | शहरातील रस्ते दुभाजकाची दुरवस्था

शहरातील रस्ते दुभाजकाची दुरवस्था

Next

रस्त्यावरच पार्किंग

शरणपूर रोड : शहरात दुचाकींची संख्या वाढल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शरणपूर रोडवर चारचाकी वाहने उभी केली जात असल्याचे पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टिळपथ ते कॅनडा काॅर्नर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे ठिकठिकाणी अनधिकृत पार्किंग झाल्याचे दिसते.

बँक खात्यातून चोरी

नाशिक : ग्राहकांच्या एटीएमचा वापर करून तसेच एटीएममधून पैसे काढण्याच्या घटना घडत असताना आता बँक खात्यातूनदेखील पैसे चोरीस जाण्याच्या घटना अनेकदा घडू लागल्या आहेत. शहरात अनेकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

अंतर्गत रस्त्याची चाळण

उपनगर : गांधीनगर येथील शासकीय वसाहतीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. वसाहतीतील हा प्रमुख मार्ग असल्याने येथून नेहमीच वर्दळ सुरू असते. स्थानिकांना या मार्गाचा अधिक उपयोग असल्याने महापालिकेने या रस्त्याची दुरवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांकडून केली जात आहे.

रक्तदानाची गरज

नाशिक : राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरातील अनेक सामाजिक संघटना तसेच कार्यकर्ते रक्तदानासाठी पुढे येत आहेत. ज्यांनी रक्तदान केले आहे, असे कार्यकर्ते इतरांना रक्तदान करण्याचेदेखील आवाहन करीत आहेत.

Web Title: Poor condition of city road dividers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.