नाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:56 PM2021-01-13T18:56:28+5:302021-01-13T18:57:18+5:30

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत ...

Poor condition of Nashik-Kalvan state road | नाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था

नाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था

Next
ठळक मुद्देवरखेडा : नागरीक रस्त्यावर येण्याच्या तयारीत

वरखेडा : नाशिक-कळवण राज्य मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू असून संथगतीने काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठिक-ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेकांना अपघात जीव गमवावा लागला आहे. या जीवघेण्या रस्त्याची त्वरीत सुधारणा करण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरीकांनी केली आहे.

नाशिक-कळवण राज्य मार्गाचे अकराळे फाटा ते कळवण पर्यंत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक पुर्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करून गेल्या तीन वर्षांपासून कामकाज सुरू केले. मात्र अद्यापही दिंडोरी शहरातील कॉंक्रीटीकरण व ठिक-ठिकाणी नुतणीकरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्याच प्रमाणे आरोग्य विद्यापीठ ते अकराळे फाटा या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे.
नाशिक-गुजरात राज्याला जोडणारा मुख्य रस्ता असून राज्य, परराज्यातून दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र तसेच अर्ध शक्तीपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत असते. दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याच्या कामकाजाकडे लोकप्रतिनिधीनी त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

नाशिक-कळवण राज्य मार्गावरील अवनखेड पुलाची व त्याच प्रमाणे ठिक ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याकडे त्वरीत लक्ष द्यावे अन्यथा स्थानिकांच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
- सुनिल जाधव, स्थानिक ग्रामस्थ.  (फोटो १३ वरखेडा १)

Web Title: Poor condition of Nashik-Kalvan state road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.