मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोडची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:41+5:302021-09-15T04:17:41+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीच्या दोन्ही सर्व्हिस रोडची मोठी दयनीय अवस्था झाली असून दररोज वाहनधारकांना छोट्या-मोठ्या ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीच्या दोन्ही सर्व्हिस रोडची मोठी दयनीय अवस्था झाली असून दररोज वाहनधारकांना छोट्या-मोठ्या अपघातांना बळी पडावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची दुरुस्ती दोन दिवसात करावी अन्यथा टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल आणि टोल वसुली बंद करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून येथील सर्व्हिस रोडची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. वाहनधारकांना व शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टोलनाका प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे .
यावेळी मनसे जिल्हा संघटक संजय मोरे,मनसे विद्यार्थी सेना निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष नितीश झुटे,मनसे विद्यार्थी सेना कार्याध्यक्ष सुमित जाधव,उपशहराध्यक्ष पियूष पाटील,समाधान फाळके,मनसे विद्यार्थी सेना संघटक सागर कटाळे, अनिल आहेर,महेश कोपरे,फरान सय्यद उपस्थित होते. (१४ पिंपळगाव १)
140921\14nsk_1_14092021_13.jpg
१४ पिंपळगाव १