नाशिक : सन २०१७ ते सन २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सार्वजनिक वाचनालय नाशिकचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, शुक्रवारी (दि. १०) उपाध्यक्षपदासाठी एक, तर कार्यकारिणी मंडळासाठी आठ अर्जांची विक्री झाली. अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी अद्याप अर्ज दाखल झाले नसले तरी रविवारपर्यंत (दि. १२) या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.शुक्रवार अखेरपर्यंत अध्यक्षपदासाठी चार, उपाध्यक्षपदासाठी आठ, तर कार्यकारिणी मंडळासाठी ३५ अर्ज वितरीत करण्यात आले असून, कार्यकारिणी मंडळासाठी शुक्रवारपर्यंत एकूण १२ अर्ज सावानाकडे प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सलग पाच वर्षे, तर कार्यकारिणी मंडळासाठी सलग तीन वर्षे सभासद असण्याबरोबरच उमेदवारांनी फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाचनालयाचे किमान एक वर्ष सभासद असलेल्या तसेच फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरलेल्या आणि अंतिम मतदार यादीत नाव असलेल्या सभासदांना या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्षपदासाठी रविवारपर्यंत अर्ज दाखल होण्याची शक्यता
By admin | Published: March 11, 2017 2:01 AM