शैलेश कर्पेसिन्नर : २१ व्या शतकातील संगणकच्या युगात पोस्टाने देखील नवनवीन बदल स्विकारण्यास सुरु वात केली आहे. याचाच भाग म्हणून मंगळवार (दि. १०) रोजी सिन्नर टपाल कार्यालयात कोर सिस्टम इंटिग्रेटेड (सीएसआय) प्रणालीचा शुभारंभ पोस्टमास्तर नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक विभागातील तब्बल ५८ कार्यालयात मंगळवारपासून सदर प्रणाली वापरण्यास सुरु वात करण्यात आली. टी. सी. एस. ही भारतातील अग्रगण्य कंपनी या प्रोजेक्टसाठी मदत करणार आहे. जगातील सर्वोत्तम असे सॅप सॉफ्टवेअर सीएसआय प्रणालीमध्ये वापरले जाणार आहे. सॅप प्रणालीच्या धर्तीवर दूरसंचार खात्याने सीएसआय प्रणाली विकसीत केली आहे. त्यामुळे पोस्टाचे कामकाज अधिक वेगाने होणार आहे. सदर प्रणाली सुरु झाल्यामुळे ग्राहक तसेच कर्मचारी वर्गास सुविधा उपलब्ध होणार आहे. पत्र निघाल्यापासून तर मिळेपर्यंत त्याचा प्रवास ‘रियल टाईम ट्रॅकिंग’ ने उपलब्ध होणार आहे. पत्र पाठवणाºयास तसेच मिळणाºयास याची माहिती एसएमएस ने पाठवली जाईल. तसेच संबंधित पोस्टमन चा मोबाईल नंबर सुद्धा त्यास पाठवला जाईल. यापूर्वी पोस्टाची अकाउंटिंग सिस्टिम गुंतागुंतीची होती या प्रणालीमुळे ती सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रत्येक पोस्ट आॅफिस हे स्वतंत्ररित्या कामकाज करण्यास सुरुवात करणार आहे. यापूर्वी कर्मचारी वर्गास रजा, आरोग्य देयके, प्रवास भत्ते यासाठी अर्ज करावे लागत होते. या प्रणालीनंतर सर्व कामकाज सिस्टिम मार्फतच होणार आहे. ज्यामुळे खºया अर्थाने पेपरलेस कामकाजाला सुरु वात होणार आहे. यासर्वांमुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. या प्रणालीच्या शुभारंभ प्रसंगी बचत बँक सहाय्यक अमोल गवांदे, नीलेश कुलथे, प्रवीण वाघ, समाधान एखंडे, मिलिंद सोनवणे, एकनाथ बेदाडे, कांतीलाल राऊत, इसाक मन्सूरी, साहेबराव डावरे, सोपान गंगावणे, अनव, पठाण तसेच सर्व शाखा डाकपाल उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक अमोल गवांदे यांनी केले तर नीलेश कुलथे यांनी आभार मानले.
पोस्ट खात्याचा ‘स्पीड’ आणखी वाढणार, सीएसआर कार्यप्रणाली : नाशिक विभागात ५८ पोस्ट कार्यालयात नवीन प्रणालीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:47 PM