भेटीच्या आश्वासनानंतर शिक्षकांच्या पायी दिंडीची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 03:48 PM2020-10-04T15:48:38+5:302020-10-04T15:48:38+5:30
सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली. शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्गमीत करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटना प्राध्यापक कर्तारसिंग ठाकुर, प्राध्यापक अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली.
शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्गमीत करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटना प्राध्यापक कर्तारसिंग ठाकुर, प्राध्यापक अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
पायी दिंडी आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयात निवेदन देऊन येवलाहून संगमनेरकडे संगमनेर येथे पोहोचली. पायी दिंडीच्या पहिल्या दिवशी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत समितीचा अहवाल कॅबिनेटसाठी सकारात्मक रित्या सुपूर्द केला. दिंडीतील
शिक्षकांनी आपला पदयात्रेचा निश्चय ठाम ठेवला. रात्री पायी दिंडीचे आगमन संगमनेर या ठिकाणी झाले त्यावेळी इंद्रजीत थोरात यांनी दिंडीत सहभागी सर्व शिक्षकांशी चर्चा केली.त्यानंतर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी व मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. येत्या आठवड्यात ज्या शाळांना टप्पा वाढ करायचा आहे अशा माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक अहवाल समितीने कॅबिनेटसमोर ठेवला असल्याचेसांगितले. आपल्याला मुंबई येथे मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळासमवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्याने पायी दिंडी स्थगित करण्यातआली.
पायी दिंडी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत,कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख यांनी परिश्रम घेतले. पायी दिंडीमध्ये प्राध्यापक दिनेश पाटील, प्राध्यापक विजय सोनवणे, निलेश गांगुर्डे, दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. पी. पाटील, प्रा. सूर्यवंशी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र महात्मे, प्रा. विवेक पाटील, प्रा. खेमचंद पाटील, प्रा.सोपान महाजन अशा राज्यभरातील पदाधिकारी व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.
(फोटो ०४ सिन्नर २)