पाथरे-शिर्डी पालखी पदयात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:15 AM2018-03-28T00:15:21+5:302018-03-28T00:15:21+5:30
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा उत्साहात पार पडली.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा उत्साहात पार पडली. पायी दिंडी सोहळ्याचे हे नववे वर्ष होते. पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मीरगाव, कोळगाव, माळवाडी, झोपेवाडी परिसरातील सुमारे १२०० साईभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. साई पालखी सोहळ्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात टाळ, मृदंग या बरोबर भजनी मंडळ सहभागी झाले होते. सार्इंची गाणी, भजने गात दिंडी सोहळा पार पडला. डीजेच्या तालावरही साईभक्त भर उन्हात नाचत, गात शिर्डीला पोहोचले. प्रत्येक साईभक्तास श्रीराम मंडळाने ओळखपत्र दिले होते. यामुळे साईभक्तांना सार्इंचे दर्शन सुलभ झाले. सर्व पायी साईभक्तांना चहा, अल्पोपाहार, भोजन, शीतपेये यांची व्यवस्था पाथरे येथील साईभक्त आणि श्रीराम मित्रमंडळातर्फे केली होती. या सोहळ्याला महिलांचा प्रतिसाद मोठ्या संख्येने मिळाला.