इंदिरानगर भागात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:06+5:302021-01-13T04:35:06+5:30
शुक्रवारी (दि.८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. चार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शिवाजीवाडी, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगरसह ...
शुक्रवारी (दि.८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. चार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शिवाजीवाडी, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगरसह परिसरात सुमारे सात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. ही घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी शनिवार (दि९) पुन्हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात होताच नासर्डी ते इंदिरानगर परिसरात सुमारे चार तास विद्युतपुरवठा खंडित झाला होता. वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे विद्युत उपक्रमांचे नुकसान होत असून, आर्थिकहानीसह मानसिक त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस सुरू होताच परिसरातील विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार काही थांबेना त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महावितरण कंपनीचा गलथान कारभार केव्हा सुधारणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.