लखमापूर, दहेगाव परिसरात वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:35 PM2021-03-15T18:35:24+5:302021-03-15T18:37:38+5:30

लखमापूर : शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत सुरू करावा अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, या मागणीचे निवेदन लखमापूर, दहेगाव, वाघळूद आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Power outage in Lakhmapur, Dahegaon area | लखमापूर, दहेगाव परिसरात वीज खंडित

दिंडोरी तहसील कार्यालयात निवेदन देताना अजित कड, ज्ञानेश्वर कड, बबन कड, रोशन कड, दीपक मोगल, संदीप मोगल, राहुल कड आदी.

Next
ठळक मुद्देतालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

लखमापूर : शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत सुरू करावा अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, या मागणीचे निवेदन लखमापूर, दहेगाव, वाघळूद आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षाची आर्थिक परिस्थिती व या वर्षाची आर्थिक परिस्थिती बघता शेतकऱ्यांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच विद्युत वितरण कंपनीने शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केल्यानेही मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा बंद केलेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेणार आहे व यास जबाबदार विद्युत वितरण कंपनी राहील, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यात लखमापूर, दहेगाव, वाघळूद आदी परिसरतील शेतकरी प्रामुख्याने, अजित कड, ज्ञानेश्वर कड, निवृत्ती कड, दीपक मोगल, संदीप कारभारी मोगल, राहुल कड, विष्णू कड, अशोक कड, साहेबराव मेधने, निवृत्ती तुकाराम मोगल, चिंधू मेधणे, पुंजा मोगल आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.
 

Web Title: Power outage in Lakhmapur, Dahegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.