रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:38 PM2020-07-05T17:38:37+5:302020-07-05T17:39:59+5:30

काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात चाचपडत असलेल्या व्यावसायिकांना त्वरीत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिल्याने दुसºयाच दिवसी वीजपुरवठा सुरळीत केल्याने लोकमतचे रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगारांनी अभिनंदन होत आहे.

Power supply to Rasaka workplace smooth | रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत

रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत

Next
ठळक मुद्देमहावितरणच्या कारभारामुळे विषयी संताप व्यक्त केला जात आहे.

काकासाहेब नगर : दैनिक लोकमतच्या वृत्ताची दखल

काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात चाचपडत असलेल्या व्यावसायिकांना त्वरीत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिल्याने दुसºयाच दिवसी वीजपुरवठा सुरळीत केल्याने लोकमतचे रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगारांनी अभिनंदन होत आहे.
दरम्यान लोकांना पंधरा दिवस अंधारात ठेवणाºया महावितरणच्या कारभारामुळे विषयी संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार विनंती करूनही विज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वा अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही परंतु लोकमतला सदर बातमी येताच सारे खडबडून जागे झाले. तर आमदार बनकर यांनी सदर विषयांची माहिती घेत तात्काळ यंत्रणेला जागे केल्याने रासाका कार्यस्थळावर उजेड पडला.
फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश या काव्यपंक्तीला अनुरून माजी आमदार अनिल कदम यांनी रासाका परिसरात सिंगल फेज योजना वीजपुरवठा दोन वर्षापूर्वी आणला होता, तर विद्यमान आमदारांनी खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु दैनिक लोकमत च्या माध्यमातूनच हे काम तवरीत पूर्णझाले हे मात्र खरे.
- विश्वनाथ जाधव, नागरीक.
रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगार पंधरा दिवसापासून अंधारात होते. या विषयी माझ्याकडे तक्र ार संबंधित कोणी आले नसल्याने याची मला कल्पना नव्हती, परंतु लोकमतमधील बातमीमुळे मला महावितरण कंपनीच्या या ढिसाळ नियोजन हीन कारभाराची जाणीव झाली व तात्काळ कारवाई करत दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरळीत केला यासाठी लोकमतचे मी खºया अर्थाने आभार मानतो.
- दिलीप बनकर, विधानसभा सदस्य, निफाड.

Web Title: Power supply to Rasaka workplace smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.