पक्षप्रमुखासमोर सेना आमदाराचे भाजपाचे गुणगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:20 AM2018-11-04T00:20:38+5:302018-11-04T00:20:57+5:30
नाशिक : शिवसेना भाजपातील धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने जाहीरपणे भाजपाचे गुणगान केल्यामुळे युतीच्या चर्चेला ...
नाशिक : शिवसेना भाजपातील धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने जाहीरपणे भाजपाचे गुणगान केल्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण येऊन गेले आहे.
पिंपळगाव बसवंत येथे आमदारांच्या विकास निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले असता त्यांच्या समक्ष सेना आमदार अनिल कदम यांनी भाजपाचे चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यामुळे सेना-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून, काहींनी तर कदम हे भाजपाचे कमळ हाती धरणार असल्याची चर्चाही सुरू केली आहे.
आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. अनिल कदम यांनी, जायकवाडीच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख करून पालकमंत्री
गिरीश महाजन यांनी दोन
जिल्ह्यात योग्य तो समतोल साधत मार्ग काढल्याबद्दल कौतुक
केले. (पान ९ वर)
तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या साºया अपेक्षा पूर्ण केल्याचे सांगून एक प्रकारे राज्यातील शेतकºयांचे सर्व प्रश्न पाटील यांनी मिटविल्याचे प्रशस्तिपत्र देऊन टाकले. कदम यांनी महाजन व पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळलल्यामुळे ते भाजपाच्या जवळ गेल्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात दररोज राज्य सरकारचे वाभाडे काढले जात असताना कदम यांनी भाजपाच्या मंत्र्यांविषयी जाहिरपणे काढलेल्या गौरवोद्गारामुळे उपस्थित शिवसैनिकांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे ओझर विमानतळावर उतरल्यानंतर उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील या दोघांचेही एकाच वाहनातून सभास्थळी आगमन झाले व या दोघांचेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केल्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात यापेक्षाही भाजपा-सेनेच्या युतीचीच चर्चा अधिक घडून आली.