कंधाणे -ज्या भाच्याला आजोळी आल्यावर प्रेमाची माया दिली अंगा खांदयावर खेळून लहानाचे मोठे होतांना पाहिले त्या भाच्याला मृत्युश्येवर पडलेले पाहून मामाने प्राण सोडल्याची ह्रदय द्रावक घटना कंधाणे ता बागलाण येथे बुधवारी रात्री घडली. यशवंत देवरे (भाचा) व नामदेव वाघ (मामा) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत गुरूवारी दोघांवर शोकाकुल वातावरणात आप आपल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. कंधाणे येथील प्रगतिशील शेतकरी यशवंत उत्तम देवरे (५२) यांना गेल्या दहा बारा दिवसापासून लिव्हरच्या आजाराने ग्रास्ले होते. उपचारासाठी त्यांना सटाणा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते, पण वैद्यकीय उपचाराला शरीर साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. घरी कंधाणे येथे आणल्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी सांयकाळी त्यांचे डांगसौदाणे येथील मामा नामदेव दोधा वाघ त्यांना पाहण्यासाठी आले. भाच्याला मृत्युच्या दाढेत पाहून मामांना गहिवरून आले आणि या धक्क्यातच ते जमिनवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. या काळीज पिळवटून टाकणा-या घटनेने कंधाणे, व डांगसौदाणे हया दोघा गावावर शोककळा पसरली. यशवंत देवरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आईवडील असा परिवार आहे तर नामदेव वाघ यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
भाच्याच्या मृत्यूच्या धक्कयाने मामानेही सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:05 PM