नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजारातील ग्राहकांची गर्दी टाळण्यासाटी नाशिक शहर व परिसरातील अनेक भाजी विक्रे त्यांनी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची तयारी केली असून ग्राहकांनी व्हॉट्सअॅप,फेसबूक सारख्या सोशल माध्यमांतून भाजी विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांना हव्या त्या भाज्यांची मागणी नोंदविल्यास भाजीविक्रेते ग्राहकाना घरपोच सेवा देणाचा प्रयत्न करणार आहे. नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे सोपे आणि कमी खर्चीक होणार आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवास्यांनी एकत्रित मागणी नोंदविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विविध समाज माध्यमांमधून केला आहे. सोबतच कोणत्याही परिस्थीत भाजीपाल्याचा तुटवडा पडणार नाही. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी घराबाहेर पडून अनावश्यक खरेदी करू नये असे आवाहनही भाजी विक्रे त्यांनी व्हॉट्सअप,फेसबूक, टष्ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे ग्राहकांनी आता कोरोनाचे संकट टाळण्यासाठी परिस्थीत गांभीर्याने घेत आपल्या परिचयातील अथवा परिसराती भाजी विक्रे त्यांशी फोनदद्वारे अथवा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून घरपोच भाजी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आळश्यक बनले आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी भाजी विक्रेत्यांची घरपोच सेवा देण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 3:20 PM
नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे सोपे आणि कमी खर्चीक होणार आहे.
ठळक मुद्देघरपोच भाजी पोहोचविण्यासाठी सोशल मिडियाचा आधार गर्दी टाळण्यासाठी भाजीविक्रेत्यांचे आणखी एक पाऊल