नांदूरशिंगोटे : गावचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या यात्रोत्सवास येत्या मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे गाव परिसरातील सुमारे ३० गावांचे मध्यवर्ती केंद्र आहे. गावचे आराध्यदैवत असलेले श्री रेणुकामाता परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी यात्रेस प्रारंभ होणार आहे. यात्रा समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक होऊन मंदिर परिसर व गावभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सकाळी ८ वाजता मंदिराच्या पटांगणात कनात उभारली जाते. सकाळी ९ वाजता देवीला मंगलस्नान व अभिषेक घातला जातो. त्यानंतर हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा व नथ चढविली जाणार आहे. यानिमित्त मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी (दि. २०) मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून, यावेळी सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत इनाम दिले जाणार आहे. यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी यात्रा समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात्रा समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- जबाजी बर्के, उपाध्यक्ष- विनायक शेळके, खजिनदार- भाऊपाटील शेळके, सचिव- राजेंद्र खर्डे, सदस्य- सरपंच गोपाळ शेळके, दीपक बर्के, विकास संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गर्जे, प्रभाकर सानप, आनंदराव शेळके, शिवनाथ शेळके, बन्सी सानप, भारत दराडे, नाना शेळके, उपसरपंच उत्तम बर्के, अनिल शेळके, शरद शेळके, गंगाराम सानप, किसन सानप, सुदाम भाबड, निवृत्ती शेळके, शशिकांत येरेकर, मनोहर शेळके, एकनाथ शेळके, अनिल शेळके, संजय शेळके.रात्री करमणुकीसाठी मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी (दि. २०) मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.कुस्त्यांची ‘दंगल’ होणार नियोजनबद्धदरवर्षी येथे यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल आकर्षक व चर्चेचा विषय ठरते. कुस्त्यांसाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील नामवंत मल्ल हजेरी लावतात. मात्र कुस्त्या लावण्यासाठी नियोजन नसल्याने गोंधळ होत होता. यावर्षी कुस्त्यांची स्पर्धा होण्यापूर्वीच मल्लांना पाचारण करण्यात आले आहे. अगोदर त्यांची नावनोंदणी केली जाणार असून, कोणाची कुस्ती कोणासोबत असणार आहे ते अगोदरच जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर वेळेचे नियोजन करून कुस्त्या लावल्या जाणार असल्याने कोणताही गोेंधळ होणार नाही. कुस्ती स्पर्धेसाठी येणाºया स्पर्धकांनी बुधवारी दुपारी३ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जय्यत तयारी : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदूरशिंगोटे येथे मंगळवारपासून रेणुकामाता यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:54 PM
गावचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या यात्रोत्सवास येत्या मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
ठळक मुद्देमंगळवारी यात्रेस प्रारंभ गावभर स्वच्छता मोहीमबांगड्यांचा चुडा व नथ चढविली जाणार