नाशिक : आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्तांनावेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीनेही तयारी सुरू झाली असून, मंडपांना परवानगी देण्यासाठी येत्या सोमवारपासून (दि.१५) सर्व विभागात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे.महापालिकेने यासंदर्भात माहिती देताना, उच्च न्यायालयाच्या नियमावलीचा आधार घेतला असून, विनापरवाना मंडप, स्टेज उभारल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यंदा गणेशोत्सव २ ते १२ सप्टेंबर रोजी आहे. परंतु त्यासाठी तयारी मात्र आत्ताच तयारी सुरू झाली आहे. लहान-मोठ्या मूर्ती साकारल्या जात आहेत, तर अनेक मोठ्या मूर्तिकारांनी आॅर्डरनुसार मोठ्या मूर्तींची कामेदेखील हातावेगळी करण्यास प्रारंभ केला आहे.सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश दिले असून, त्या अनुषंघाने नाशिक महापालिकेने नियमावलीदेखील केली आहे. गेल्यावर्षी नियमावलीनुसार मंडप बांधण्याचा विषय बराच गाजला होता. अनेक उत्साही मंडळींनी मंडप बांधून त्यानंतर परवानगी घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून वाद वाढला होता. यंदा मात्र महापालिकेने अगोदरच कार्यवाही सुरू केली असून, १५ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत महापालिकेकडे अर्ज करून परवानगी घेणाऱ्यांनाच मंडप उभारू दिले जाणार आहेत.यंदाही भालेकरमैदान गाजणार ?शहरातील पाच गणेश मंडळे भालेकर मैदानात उत्सव साजरे करतात. मात्र गेल्यावेळी याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम सुरू असल्याने वाद निर्माण झाला होता. आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध गणेश मंडळे असा वाद निर्माण झाला त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही जागा मिळाली असली तरी आता याठिंकाणी स्मार्ट पार्किंग सुरू झाले असून, ही जागा मंडळांना मिळणार काय हा वादाचा विषय आहे.गणेशमूर्तीगाळ्यांचाही प्रश्नगेल्यावर्षी महापालिकेने गणेशमूर्ती गाळे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील जागेत थाटण्यास मनाई करून इदगाह मैदानावर गाळे उभारण्यास सांगितले होते. त्यासाठी लिलावदेखील घेण्यात आले होते. मात्र पारंपरिक विक्रेत्यांनी त्यास विरोध करीत ठक्कर डोमची जागा निवडली होती. त्यामुळे यंदा स्टॉल्सचे काय होते हादेखील चर्चेचा विषय ठरणार आहे.
विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:43 AM
आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्तांना वेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीनेही तयारी सुरू झाली
ठळक मुद्देमूर्ती रंगकामाला वेग ; महापालिकेने मागविले मंडपासाठी अर्ज