प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग

By अझहर शेख | Published: October 9, 2019 04:57 PM2019-10-09T16:57:25+5:302019-10-09T17:00:06+5:30

भारतीय वायुसेनेत दाखल झालेले अत्याधुनिक ‘रूद्र’ हेलिकॉप्टर अद्याप कॅटस्च्या ताफ्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून या हेलिकॉप्टरची कॅटस्ला प्रतीक्षा आहे.

Presented Colors: 'Rudra' Participates in 'Cats' Aerobics | प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग

प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग

Next
ठळक मुद्देलढाऊ उड्डाणाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण २००७ साली लढाऊ रूद्र हेलिकॉप्टरची निर्मिती

अझहर शेख,
नाशिक :
चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरसोबत अत्याधुनिक एचएएल बनावटीचे लढाऊ ‘रूद्र’ हेलिकॉप्टरदेखील ‘प्रेसिडेंट कलर्स’ सोहळ्याच्या निमित्ताने हवाई कसरतींसाठी भरारी घेणार आहे. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅटस्) या औचित्त्यावर रूद्र दाखल झाले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सरावादरम्यान रूद्र हेलिकॉप्टरच्या घिरट्या आकाशात नाशिककरांना पहावयास मिळाल्या.

कॅटस्च्या ‘रन-वे’वरून आकाशात रूद्रचा टेक-आॅफ गुरूवारी (दि.१०) पुन्हा पहावयास मिळेल. ‘कॅटस्’च्या ताफ्यात चित्ता, चेतक, ध्रुव या तीन प्रकारचे हेलिकॉप्टर सहभागी आहेत. या हेलिकॉप्टरद्वारे लढाऊ उड्डाणाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी कॅटस्मधून लढाऊ वैमानिकांची एक तुकडी देशसेवेत दाखल होते. त्यांच्या दीक्षांत सोहळ्यात सन्मानपुर्वक वरिष्ठ लष्करी अधिकारी वैमानिकांना ‘विंग’ प्रदान करतात. यावेळी चित्तथरारक हवाई प्रात्याक्षिके हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांकडून सादर केली जातात. या प्रात्याक्षिकांमध्ये चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टरचा समावेश असतो. भारतीय वायुसेनेत दाखल झालेले अत्याधुनिक ‘रूद्र’ हेलिकॉप्टर अद्याप कॅटस्च्या ताफ्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून या हेलिकॉप्टरची कॅटस्ला प्रतीक्षा आहे. गुरूवारी (दि.१०) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्कार सोहळ्यासाठी खास अन्य दुस-या शहरातील एव्हिएशन केंद्रातून रूद्र गांधीनगरच्या कॅटस्मध्ये दाखल झाले आहे. या सोहळ्यासाठी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सरावादरम्यान चित्ता, चेतक, ध्रुव या तीन लढाऊ हेलिकॉप्टरसोबत ‘रूद्र’नेदेखील सहभाग घेत आकाशात घिरट्या घातल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने का होईना कॅटस्च्या प्रारंगणातून रूद्रची भरारी नाशिककरांना मागील तीन दिवसांपासून सरावादरम्यान पहावयास मिळत आहे. रूद्र हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती प्रेसिडेन्ट कलर्स सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.

...असे आहे ‘रूद्र’
एचएएलमार्फत निर्मित रूद्र हेलिकॉप्टर ध्रुवचा एक सशक्त प्रकार आहे. या लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती २००७ साली झाली. २०१२साली एचएएलकडून भारतीय सेनेला रूद्र हस्तांतरीत केले गेले. या हेलिकॉप्टरला पुढील बाजूने २० एम.एमची बंदूक, ७० एमएमचे रॉके ट पॉड, एन्टी टॅन्क गाइड मिसाइलसह हवेतून हवेत शत्रुवर हल्ला करणाºया मिसाइलने सुसज्ज आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे हे भारतात विकसीत केले गेलेले पहिले हेलिकॉप्टर आहे.

Web Title: Presented Colors: 'Rudra' Participates in 'Cats' Aerobics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.