तस्करी रोखण्यासाठी महाराष्टÑ-गुजरात साथ-साथ ;वनसंरक्षण : जंगलांचा ºहास थांबविणार; सीमेवर संयुक्त गस्त सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:47 AM2017-12-11T00:47:12+5:302017-12-11T00:49:17+5:30
अझहर शेख । नाशिक : महाराष्टÑ-गुजरात राज्यात सध्या विकासावरून राजकीय स्पर्धा सुरू आहेच, शिवाय काही बाबतीत सुप्त संघर्ष सुरू ...
अझहर शेख ।
नाशिक : महाराष्टÑ-गुजरात राज्यात सध्या विकासावरून राजकीय स्पर्धा सुरू आहेच, शिवाय काही बाबतीत सुप्त संघर्ष सुरू असताना वनविभाग मात्र एकत्र आले आहेत. सीमेवरील नाशिक वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या जंगलात वाढती घुसखोरी आणि तस्करीकरिता केली जाणारी वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यांच्या वनविभागाने ‘अॅक्शन प्लॅन’ आखला आहे.
नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी तालुक्यांमधील जंगलात दिवसेंदिवस तस्करटोळ्या सक्रिय होऊ लागल्याने वनविभागाची झोप उडाली आहे. येथील वृक्षसंपदेला वाचविण्यासाठी नाशिक पूर्व वनविभाग स्थानिकस्तरावर आदिवासींच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती गाव-पाड्यांवर गठित करण्यापासून तर ग्रामसभांमध्ये समुपदेशन करण्यापर्यंत विविध प्रयोग राबविण्याचा प्रयत्न करत आहे. याबरोबर वनविभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. नाशिक जिल्ह्याच्या जवळ असलेल्या सीमेवरील डांग, बलसाड, वापी जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांना संयुक्त बैठकीसाठी उपवनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी निमंत्रित केले होते.
गुजरातमध्ये गुटखा व्यवसायासाठी लागणाºया काथाला मोठी बाजारपेठ आहे; मात्र काथ मिळविण्यासाठी खैरचे जंगल नाशिक वनविभागाच्या हद्दीत दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. यामुळे खैर तस्करांच्या टोळ्या सातत्याने घुसखोरी करून गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना लावण्याचा प्रताप करत आहे. सदर समस्या गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नाशिक पूर्व वनविभाग खडबडून जागे झाले.
दोन महिन्यांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील वनपरिक्षेत्रातून खैराची तस्करी करणारी टोळी नाशिक पूर्व वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी रंगेहाथ पकडली होती; मात्र यावेळी या टोळीची पाळेमुळे गुजरातच्या वापीमध्ये रुजल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका संशयिताला वापीमधून सुरगाणा वनपरिक्षेत्राच्या अधिकाºयांनी ताब्यात
घेतले होते.आपापसांत संवादातून माहितीची देवाणघेवाण वनसंपदेवर डोळा ठेवून असलेल्या गुजरातमधील गुन्हेगारांच्या टोळीबाबतची महत्त्वाची माहिती यावेळी बैठकीत नाशिक पूर्व वनविभागाच्या पथकाला पुरविण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक वनविभागानेही महत्त्वाचे तस्करीच्या गुन्ह्यातील धागेदोरे मिळविण्याबाबत चर्चा घडवून आणली. यावेळी अधिकारी वर्गाने वनरक्षक, वनपाल यांचे आपापसांत चर्चासत्रही घेतले. यावेळी वनसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजनांची गरज व अंमलबजावणीविषयी एकमेकांमध्ये माहितीचे आदानप्रदान झाले.