महिला आरोग्यसेविकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:21+5:302021-03-13T04:25:21+5:30
सहाणे यांना आदर्श महिला पुरस्कार सिन्नर : बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांना एकत्रित करत महिला सबलीकरणासह शासकीय योजनांची ...
सहाणे यांना आदर्श महिला पुरस्कार
सिन्नर : बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांना एकत्रित करत महिला सबलीकरणासह शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या विजया सहाणे यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संघर्षातून कुटुंबाची प्रगती साधणाऱ्या सहाणे यांचा पाटोळे येथील राम कृष्ण हरी सेवाभावी संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला.
खेळणी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
सिन्नर : कोरोना महामारीने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात थैमान घातल्याने तब्बल आठ महिने जिल्ह्यात लॉकडाऊन करावा लागला होता. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, तर दैनंदिन विक्री करून हातावर पोट असणाऱ्यांना त्याचा जास्त फटका बसला आहे. यात्रा, जत्रा बंद असल्याने खेळणी विकणाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
पंचाळेच्या सरपंचपदी विठाबाई थोरात
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विठाबाई शांताराम थोरात, तर उपसरपंचपदी प्रकाश रंगनाथ थोरात यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक प्रमोद शिरोळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
कांद्याच्या दरात घसरण
सिन्नर : लाल व उन्हाळी कांद्याची आवक साधारण असताना गत आठवड्यापासून कांदा पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने वेळीच दखल घेऊन निर्यातीसाठी राज्य व केंद्राने प्रतिक्विंटल निर्यात अनुदान देण्याची मागणी होत आहे.