आदिवासी गावात खर्चाला फाटा देत आदिम लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:13 AM2018-04-23T00:13:54+5:302018-04-23T00:13:54+5:30
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला.
तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला.शेकडो वर्षांची संस्कृती असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने डोंगर- दºयांमध्ये राहणारा. मात्र काळानुरूप या समाजामध्येही आधुनिकतेचा रंग चढू लागला होता. प्रतिष्ठेसाठी इतर समाजाप्रमाणेच आदिवासी समाजातही लग्न सोहळ्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागत होता. शासनाकडून लग्नांसाठी तुटपुंजी मदत दिलीही जात असे; मात्र महागाईच्या जमाम्यात लग्न पार पाडायचे म्हणजे कर्जकाढल्याशिवाय पर्याय राहत नसे. शेकडो वर्षांपासून वाड्या- वस्त्यांवर एकोप्याने राहणाºया आदिवासी समाजामध्ये गरीब व श्रीमंतीची दरी निर्माण झाली. या अनिष्ठ प्रथा बंद करून आदिवासी संस्कृतीचा वारसा जपला जावा यासाठी सुशिक्षित व विविध पदांवर नोकरीस असणाºया आदिवासी बांधवांनी आदिवासी बचाव अभियानांतर्गत आदिम लगीन सोहळा साजरा करण्याचे काम सुरू केले आहे. या सोहळ्यांतर्गत सावरगाव येथे चि. देवानंद व चि. सौ. कां. वैशाली यांनी प्रथम धान पूजन करून महाभूतांची व निसर्गाची पूजा केली. मांडव मंत्रकार रमेश भोये यांनी मंगलाष्टके म्हटली. पुजारी दत्तू साबळे यांनी विविध पारंपरिक विधी करत उभय जोडपे विवाहबद्ध झाले. अन्नाचा कण न् कण कष्टाने कमवावा लागतो म्हणून पंगतीतल्या जेवणात अन्नाची नासधूस करायची नाही असे आवाहन अभियानातील पदाधिकाºयांनी केल्यानंतर पात्रामध्ये अन्नाचा एक कणही शिल्लक राहिला नाही.
विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वराची मिरवणूक घोड्यावर न काढता सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली. वधू-वरांवर अक्षताऐवजी विविध प्रकारच्या परंतु सहज उपलब्ध होणाºया फुलांचा वर्षाव करण्यात आला. यामुळे अन्नधान्याचे नुकसान टाळता आले.