वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मुंबईहून नाशिक मार्गे उत्तर प्रदेशकड़े जाणारी खासगी बस (क्रमांक यूपी ६५ ईटी ०००१) वाडीव-हे पोलीस स्टेशन हद्दीतील बैसाखी पंजाब समोर येताच बसमधील वायरने शार्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. यावेळी चालक व क्लीनर हे दोघेच बसमध्ये असल्याने त्यांनी बसमधून उडी घेत आपले जीव वाचवले, मात्र काही क्षणात बसने मोठा पेट घेतला. जवळील गांधी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिक यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी वाडीव-हे पोलीस व महामार्ग पोलीस यांनी खासगी क्रेनने जळलेली बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. अधिक तपास वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खांदवे करीत आहेत.
खासगी बस आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 1:28 AM
नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ठळक मुद्देवाडीवऱ्हेजवळील घटना : चालक- क्लिनर बचावले