मोबाईलमुळे खाजगी पत्रव्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 06:31 PM2020-12-21T18:31:30+5:302020-12-21T18:31:53+5:30
चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेट व मोबाईलमुळे काही क्षणातच संपर्क होत आहे. त्यामुळे आता खाजगी पत्रव्यवहार बंद झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी गावात पोस्टमन आला की, नागरिकांना आपले नातेवाईकाचे पत्र आले का ?
याची उत्सुकता असे. नागरिक मोठ्या आतुरतेने चौकशी करित होते. परंतु, आता मोबाईलच्या बोलबालामुळे डाक कार्यालयाचे खासगी महत्त्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या केवळ डाक कार्यालयातून शासकीय कामकाजाचा पत्रव्यवहार होत आहे. त्यात नोकरीचे आदेश, बँकाची नोटीस, न्यायालयाच्या नोटीसा व कागदपत्र, सहकारी सोसायटीचे अहवाल, विमा पॉलिसी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेचे चेकबुक, एटीएम कार्ड आदींसाठी पोस्ट कार्यालयाचा वापर होत आहे.
स्पिड पोस्टचा वापर...
खाजगी पत्रव्यवहार कमी झाला असला तरी स्पीड पोस्टचा वापर कायम आहे. डाक कार्यालयातील ऑनलाईन सेवेमुळे आता पैसे ट्रान्सफरही होत आहेत.
- संदीप आवारे, पोस्टमन.