माथाडी कामगारांचा संपामुळे शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 07:09 PM2020-12-14T19:09:00+5:302020-12-14T19:11:54+5:30

पिंपळगाव बसवंत : बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोमवारी (दि १४) रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Problem of farmers due to strike of Mathadi workers | माथाडी कामगारांचा संपामुळे शेतकऱ्यांची अडचण

माथाडी कामगारांचा संपामुळे शेतकऱ्यांची अडचण

Next
ठळक मुद्देपिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामगारांचा संपास पाठिंबा

पिंपळगाव बसवंत : बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोमवारी (दि १४) रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

बाजार समितीचे आवर शुकशुकाट पाहायला मिळात आहे. पिंपळगाव-शिरसगाव रोडवर असलेल्या जुन्या बाजार समितीच्या आवारात आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून माथाडी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली. लेव्हीचा प्रश्न निकाली काढावा, माथाडी मापाऱ्यांना फंडाची रक्कम दुप्पट करावी, बोनस मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. मात्र बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. त्यासाठी होणारी अडचण थांबावावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. पिंपळगाव येथील संपात नारायण पोटे, दीपक दौंडकर, दीपक मोरे, विष्णू शिंगाडे, गणेश कुशारे, ज्ञानेश्वर चारोस्कर, नितिन गायकवाड, अनिल वाघले आदींसह इतर माथाडी कामगार सहभागी झाले आहेत.
शासनाकडून दुर्लक्ष...
माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यास पिंपळगाव येथील कामगारांनी पाठिंबा देत संपात सहभाग दर्शविला. कोरोना काळापासून माथाडी कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १३६ हून अधिक माथाडी कामगार बंदमध्ये सहभागी झाले असल्याने बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प आहेत.

शेती मालाची मोठी आवक...
तालुक्यातील पिंपळगाव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती महत्वाची बाजारपेठ आहे. मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक होत असते. मात्र, गेल्या महिन्याभरात व्यापारी, शेतकरी आंदोलनामुळे तब्बल दोन वेळा ही बाजार समिती बंद राहिली आहे.
(१४ पिंपळगाव बसवंत)

Web Title: Problem of farmers due to strike of Mathadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.